konkandhara.com

Image

दशावतार हे आपल्या कोकणचे वैभव : सुनील मयेकर

वेगुर्ला | प्रतिनिधी : संजय पिळणकर

वेगुर्ला : खानोली येथे पौराणिक नाट्य महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा मालगुंड या नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या मनोगतात त्यांनी कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा मानबिंदू असलेल्या दशावतार नाट्यकलेचा गौरव करत, “दशावतार हे कोकणचे वैभव आहे,” असे मत व्यक्त केले.

दशावतार ही कोकणची खरी ओळख असून, या कलेच्या जतनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “दशावतार ही केवळ नाट्यकला नसून ती आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.

उद्घाटन कार्यक्रमात बुवा भालचंद्र केळुसकर, बाळू देसाई, शासकीय लेखापरीक्षक धर्णे, शरद चव्हाण, सदानंद मेस्त्री, सिध्देश्वर प्रभु, संतोष सनगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी दशावतारातील पारंपरिक वेशभूषा, रंगभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

खानोलीतील हा नाट्य महोत्सव आठवडाभर चालणार असून, विविध पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. या महोत्सवात स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या महोत्सवामुळे लोककलेला नवे व्यासपीठ मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रसिक प्रेक्षकांकडून महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या सुनिल मयेकर यांचा खानोली ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान