konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात
Image

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील जनरेटर सुरू न झाल्याने पोस्टमार्टमसाठी आणलेला मृतदेह तब्बल तीन तास अंधारात पडून राहिल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी रात्री तळवट पाली येथून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाला. रुग्णालयात दोन जनरेटर असतानाही एक बंद अवस्थेत होता, तर दुसऱ्यासाठी डिझेल उपलब्ध नसल्याने तोही सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले.

या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्याचवेळी आपत्कालीन शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीची वेळ आली असती, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीती व्यक्त होत आहे.

घटनेनंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. ‘उपजिल्हा रुग्णालय’ हे केवळ नावापुरतेच उरले आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Releated Posts

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चंद्रशेखर जोशी दापोली : डोंबिवली येथून पर्यटनासाठी आलेल्या एका २३ वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील वळणाजवळ रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू

चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत
दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त
चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श : आरटीओ अधिकारी पराग मातोंडकरांनी स्वतःच्या खर्चाने केले रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन
पावसाआधी रस्ते पूर्ण करा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ! संजय गवस यांचा थेट इशारा
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर