konkandhara.com

टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

रत्नागिरी: रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल चार वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. बुधाराम रामलाल (वय ४२, रा. हिम्मतनगर, चंदनपुरा, ता. लोहावर, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला बुधवारी रात्री पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले.

रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात सन २०२२ मध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८१, ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

रत्नागिरी पोलिस दलाने विकसित केलेल्या एआय-आधारित ‘रेडस् ॲप’च्या मदतीने आरोपीचे चित्र पुनर्निर्मित करण्यात आले. या चित्राच्या आधारे प्रथम मुंद्रा (गुजरात) येथे शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुंबईत धाव घेतली.

पनवेल येथील कळंबोली सर्कल परिसरातून बुधवारी रात्री आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांच्या पथकाने केली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे