konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर
Image

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर

मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला.

“दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले.

“दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती”

सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले –

“उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले –

“मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.”

त्यांनी पुढे भर दिला –

“मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान