konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • “अधिकाऱ्यांचा बेपत्ता कारभार उघड ; दोडामार्ग पंचायत समितीत सदस्यांचा संताप उसळला !”
Image

“अधिकाऱ्यांचा बेपत्ता कारभार उघड ; दोडामार्ग पंचायत समितीत सदस्यांचा संताप उसळला !”

दोडामार्ग : भूषण सावंत : पंचायत समितीची मासिक सभा सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. मात्र या सभेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध विभागांची रखडलेली कामे, वारंवार सूचना देऊनही कोणतीच ठोस हालचाल न झाल्याने सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.

विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या खात्यांचे प्रमुख अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याने संताप आणखी वाढला. “जनतेच्या प्रश्नांकडे इतकी बेफिकिरी का?” असा थेट सवाल करत सदस्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. रखडलेल्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना संबंधित अधिकारी मात्र जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या बैठकीत उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया कुबल तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस उपस्थित होते. सदस्यांनी एकमुखाने प्रशासनाला इशारा देत, “यापुढे कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा ठाम इशारा दिला.

सभागृहात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी संबंधित विभाग जागे होणार का, की जनतेचा संताप आणखी भडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे