konkandhara.com

Image

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज : आ. दीपक केसरकर

कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन उत्साहात

सिंधुदुर्ग : वृक्ष लागवड करून थांबून चालणार नाही, तर वृक्ष संवर्धन आणि जतन ही काळाची गरज आहे. केवळ फोटोसाठी वृक्षारोपण न करता प्रत्येकाने लावलेले झाड जगवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.

कुडाळ येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. ‘जय वासुदेवानंद हॉल’ येथे झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड सभापती तन्वी चांदोस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित सुयोग धस होते.

यावेळी बोलताना आ. केसरकर म्हणाले की, हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून निसर्गाचे चक्र विस्कळीत होत आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करावे, तरच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याची खंत व्यक्त केली. निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, त्यामुळे वृक्ष लागवड, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाची सुरुवात सकाळी ‘वृक्षदिंडी’ने झाली. कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशी ही दिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व वृक्षपूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अंतरीय गड किल्ले संवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांच्या शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मालवण येथील पिटर शेरॉन यांच्या गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शनासह प्रकाश कदम यांच्या निसर्ग फोटो गॅलरीचेही उद्घाटन झाले. ऋतुजा गवस यांनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संमेलनात सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे, कार्मिस अल्मेडा, ज्ञानेश्वर रेडकर तसेच रक्तचळवळीत योगदान दिल्याबद्दल श्यामल मांजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : कुडाळ येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलनात आ. दीपक केसरकर यांचा संस्थेचे अध्यक्ष सुयोग धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आशिया रिजवी, बादल बेले, जोवेल डिसिल्व्हा, बापू परब, संजय पिळणकर आदी उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे