konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
Image

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चंद्रशेखर जोशी

दापोली : डोंबिवली येथून पर्यटनासाठी आलेल्या एका २३ वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील निनाद विजय ठाकुरदेसाई हे त्यांच्या कुटुंबियांसह २४ एप्रिल रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. त्यांनी दापोली तालुक्यातील वळणे येथील एका रिसॉर्टमध्ये रूम घेतली होती.

ठाकुरदेसाई कुटुंबियांनी समुद्रावर जाऊन तेथील आनंद लुटला होता. आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा २३ वर्षीय मुलगा श्रवण यास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.

श्रवण याचे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण झाले होते. तो गुजरात येथील एका हॉटेलमध्ये शेफचे काम करत होता.

Releated Posts

पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील वळणाजवळ रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू

चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत
दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात
चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श : आरटीओ अधिकारी पराग मातोंडकरांनी स्वतःच्या खर्चाने केले रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन
पावसाआधी रस्ते पूर्ण करा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ! संजय गवस यांचा थेट इशारा
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर