konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी घाबरू नये, वाशिष्ठी अहवालाबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आवाहन
पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी घाबरू नये वाशिष्ठी पाण्याबाबत अफवा; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना दिलासा दिला.

पालिकेकडून शुद्ध पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी घाबरू नये, वाशिष्ठी अहवालाबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे आवाहन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाण्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर पालिकेकडून नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीच पुरवले जात असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

नगराध्यक्ष सकपाळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाशिष्ठी नदीचे पाणी प्रदूषित असल्याबाबत कोणताही अधिकृत अहवाल नगर पालिकेकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अशा चर्चांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूण नगर पालिका जॅकवेलच्या माध्यमातून नदीतून पाणी उचलते. त्यानंतर त्या पाण्यावर अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रक्रियेद्वारे आवश्यक सर्व टप्प्यांमध्ये प्रक्रिया केली जाते. फिल्ट्रेशन, क्लोरीनेशनसह विविध तांत्रिक प्रक्रियेनंतरच हे पाणी नागरिकांना पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले.

तसेच, “मी स्वतः जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे,” असेही सकपाळ यांनी सांगितले.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा नियमितपणे तपासली जात असून, पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवता निर्धास्त राहावे, असे आवाहनही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे