konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • “पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत
“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली.

दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे