konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन
chiplun-census-2027-training-digital-census-india

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ, देशातील पहिली डिजिटल जनगणना; मोबाईल ॲप व पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : देशातील सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असलेल्या ‘जनगणना २०२७’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, त्याअंतर्गत चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सोमवारी प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे आणि राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे हे मास्टर ट्रेनर म्हणून उपस्थित होते. तसेच जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यंदाच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना मोबाईल ॲपचा वापर, माहिती नोंदणी प्रक्रिया, नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक हाताळणी, तसेच CMMS पोर्टलद्वारे माहिती संकलन आणि नियंत्रण याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे.

‘जनगणना २०२७’ ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ तर दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ असा असेल. यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांची प्रगणक (Enumerators) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तयार करण्यात येत असलेले फील्ड ट्रेनर्स पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, जलद आणि प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान