konkandhara.com

  • Home
  • क्रिडा
  • Asia Cup 2025: ड्रीम 11नं माघार घेतली; लीड स्पॉन्सरशिवाय उतरणार टीम इंडिया, बीसीसीआय नवा प्रायोजक शोधतंय
Image

Asia Cup 2025: ड्रीम 11नं माघार घेतली; लीड स्पॉन्सरशिवाय उतरणार टीम इंडिया, बीसीसीआय नवा प्रायोजक शोधतंय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 मध्ये लीड स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरणार आहे. ड्रीम 11नं बीसीसीआयसह केलेला करार संपवल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर लीड स्पॉन्सरचं नाव दिसणार नाही, हे सर्वप्रथम ऑलराऊंडर शिवम दुबे यानं शेअर केलेल्या नव्या किटच्या फोटोमधून स्पष्ट झालं.

बीसीसीआयनं तत्काळ नव्या लीड स्पॉन्सरसाठी अर्ज मागवले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा लागेल, तर 16 सप्टेंबरला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाइन गेमिंग रेग्युलेशन बिल मंजूर केलं. या कायद्यामुळेच ड्रीम 11नं बीसीसीआयसह करार तोडला, अशी माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयनं पुढील तीन वर्षांसाठी लीड स्पॉन्सरशिपचे दर निश्चित केले आहेत — दोन देशांमधील सामन्यांसाठी साडेतीन कोटी आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांसाठी दीड कोटी रुपये. बोर्डाला यामधून 400 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे.

यापूर्वीही टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजक वारंवार बदलले आहेत. सहारा, स्टार, ओप्पो, बायजू आणि ड्रीम 11 या कंपन्या विविध कारणांमुळे करार संपवून निघून गेल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता अधिक स्थिर आणि दीर्घकालीन स्पॉन्सरशिपसाठी प्रयत्नशील आहे.

Releated Posts

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्या चिपळुणात उद्घाटन; सुनील मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला रविवार, दि. १२ एप्रिलपासून चिपळूण येथे सुरुवात होत…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

चिपळूणमध्ये पहिलीच ‘रत्नागिरी प्रीमियर लीग २०२६’ दिमाखात संपन्न, केदारनाथ स्पोर्ट्स क्लब खरवते विजेता; विशू इलेव्हन चिपळूण उपविजेता

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील ऐतिहासिक पावन तलाव मैदानावर प्रथमच आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी प्रीमियर लीग (आरपीएल)…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

रणजीपटू सुनील मोरे चिपळूणमधील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रविवारी उपस्थित राहणार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथे दि. १२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान