konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा
Image

आमच्या ताटात हात घालू नका! – अलिबागमध्ये आदिवासी-कोळी समाजाचा इशारा

अलिबाग | राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोळी व आदिवासी समाज आक्रमक झाला असून येत्या 30 सप्टेंबर रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शनिवारी (20 सप्टेंबर) अलिबाग येथे झालेल्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा नेत्यांनी मांडला.

जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीप भोईर म्हणाले, “आमचा कुणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही. परंतु आमच्या हक्काच्या जागेत कुणी डोकावलं, तर ते आम्ही सहन करणार नाही. आधीच आदिवासी व कोळी बांधव अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी आमच्या ताटात हात घालण्याचा प्रयत्न आम्ही रोखून धरू.”

बैठकीला माजी तहसीलदार मोरेश्वर आडके अध्यक्षस्थानी होते. यावेळी आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक, माजी तहसीलदार रवी पाटील, ऑफ्रोह संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, धर्मा लोभी, गजानन पाटील आदींसह अनेक समाजनेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन समाजबांधवांना एकत्र करण्याचं ठरलं आहे. स्वतंत्र समित्या स्थापन करून नियोजन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनातून कोळी व आदिवासी समाजाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर कुणाचाही डोळा असू नये.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान